Home / CITY NEWS / लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका ओपिनियन मेकर्सची : अश्विन मुद्गल 

लोकशाहीत प्रसार माध्यमांची भूमिका ओपिनियन मेकर्सची : अश्विन मुद्गल 

SRTV NEWS Live

..राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त उत्कृष्ट जनसंपर्क अधिकारी म्हणून अनिल गडेकर यांचा सन्मान 
SRTVNEWSlive Nag 21April: लोकशाहीत प्रसारमाध्यमांची भूमिका ओपिनियन मेकर्स- ‘मत निर्मात्याची’ असते. आधुनिक काळात संदेशवहन विद्युत गतीने होत असल्याने जनसंपर्क अधिकाऱ्यांची कार्यपद्धतीही बदलत आहे. प्रसारमाध्यमसंदर्भात काम करतांना सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारुन सुवर्णमध्य साधणे महत्वाचे असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी सांगितले. 
राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचे प्रेस क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार प्रदीपकुमार मैत्र  तसेच प्रमुख पाहुणे म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, पी.आर.एस.आय.चे अध्यक्ष सत्येंद्र प्रसाद सिंग, महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते उप‍स्थित होते. 
भारतीय संविधानाची प्रस्तावना ही एक प्रकारचा संकल्प पत्र असून राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त  ‘एक राष्ट्र, एक आवाज, एक संकल्प’ या विषयाला ती समर्पक ठरते, असेही जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी प्रतिपादन केले. 
याप्रसंगी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांचे हस्ते बेस्ट पी.आर.ओ. म्हणून अनिल गडेकर यांचा शाल, श्रीफळ ,तुळशी रोप व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना अनिल गडेकर म्हणाले की बदलत्या काळात जनसंपर्क 
माहिती अधिकारी म्हणून कर्तव्य बजावतांना प्रसंगावधान राखून घटनेचे महत्व ओळखून संबंधित माहिती प्रसारमाध्यमांना देणे आवश्यक असते. 
जनसंपर्क अधिकारी हा संस्थेचा आरसा असतो व संस्थेप्रती जनमानसात सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचे आव्हानात्मक काम तो करीत असतो. देशातील सध्याच्या परिस्थितीचा वेध घेत एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर हा महत्वपूर्ण विषय पब्लिक रिलेशन्स सोसायटीने जनसंपर्क दिनाच्या निमित्ताने पुढे आणला असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष भाषणात प्रदीप मैत्र यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन नागपूर मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी अखिलेश हळवे यांनी तर आभार प्रदर्शन यशवंत मोहिते यांनी केले. पी.आर.एस.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.अजित पाठक यांचा शुभेच्छा संदेशाचे वाचन व अनिल गडेकरांचा परिचय आकाशवाणीच्या सहाय्यक संचालिका गौरी मराठे यांनी केला. कार्यक्रमाला नागपुरातील कॉर्पोरेट, शासकीय, खाजगी संस्थांमधील जनसंपर्क अधिकारी, निवृत्त अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, पी.आर.एस.आय.चे पदाधिकारी व सदस्य तसेच प्रेस क्लबच पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!