Home / BREAKING NEWS / महायुती सरकारचे गुंडांना अभय,मुख्यंत्र्यांना गुंड राजरोसपणे भेटतोय

महायुती सरकारचे गुंडांना अभय,मुख्यंत्र्यांना गुंड राजरोसपणे भेटतोय

SRTV NEWS Live

जामीनावर बाहेर असलेल्या निलेश घायवाळ गुंडाकडून मंत्रालयात रिलबाजी
सामान्य माणूस मात्र मंत्रालयाबाहेर रांगेत उभा
यालाच म्हणायचे का अच्छे दिन 
विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे सरकारवर टिकास्र

Mumbai,6 Feb :-महायुती सरकार राज्यातील गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने हे गुंड राजरोस फिरत आहेत. जामिनावर सुटलेला गुंड निलेश घायवाळ मुख्यमंत्र्यांना भेटतो. मंत्रालयात बिनधास्त फिरतो. मंत्रालयात रिल्स बनवतो. सामान्य माणूस मात्र रांगेत उभा असतो. यालाच म्हणायचे का अच्छे दिन असा, सवाल करत विजय वडेट्टीवार यांनी गुंडांना राजाश्रय मिळत असल्याच्या मुद्यांवरून सरकारवर आज पुन्हा तोफ डागली.

मुंबई येथे ‘प्रचितगड’ या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, रोज एक नवा गुंड सरकारच्या भेटीला येत असून सरकारमधील मंत्र्यांना, काही मंत्र्यांच्या मुलांना याचे काहीच वाटत नाही. म्हणजे सरकार गुंडांना अभय देत असून या सरकारच्या काळात गुंडाराज सुरू असल्याचे स्पष्ट आहे. गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतायत आणि सामान्य जनता मात्र बाहेर रांगेत उभा असते. याची सरकारला लाज देखील वाटत नाही.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!