तर भाजपला ऐवढे नेते बोलाविण्याची गरज पडली नसतीः विकास ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर टोला

नागपूर, ता ८ एप्रिलः लोकसभा निवडणूकीत मी प्रचार करणार नाही, चहा पाजणार नाही, बॅनर लावणार नाही, अशी भाषा करणाऱ्या नेत्यांना नागपूरच्या जनतेने घाम फोडले आहे. भाजपने फुगवलेल्या आभासी विकासाचा फुगा जनतेसमोर फुटला आहे. नागरिकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना नागरिकांकडून बेरोजगारी, महागाईवर प्रश्न विचारण्यात येत आहे. याचे उत्तर नसल्याने भाजप नेत्यांना नागपुरात प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्र्यांची गरज पडत आहे. त्यावरुन नागपूर लोकसभा निवडणूकीबद्दलची भाजपच्या मनातील भिती दिसून असल्याचा घणाघात इंडीया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी लागावला. बीबीसी या वाहीनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
पाठिंबा दर्शवत आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना शहरात प्रचारासाठी फिरणेही नागरिकांनी कठीन करुन सोडले आहे. म्हणूनच देशात विकासाचा डंका पिटणाऱ्यांना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ, आणि केंद्रीय मंत्र्यांना प्रचारासाठी नागपुरात बोलवावे लागत आहे.”
शहरातील तापमानासह लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा पाराही शहरात वाढला आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता नागपूरच्या दक्षिण-पश्चिममध्ये उंटखाना चौक येथून जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर पीटीएस क्वॉर्टर, बास्केटबॉल ग्राऊंड, महेश कॉलनी, वकील पेठ, क्रीडा चौक, सोमवारी क्वॉर्टर मार्गे, गांधी विद्यामंदीर, मंगलमूर्ती चौक, नेहरुनगर चरडे गल्ली मार्गे रेशिमबागमध्ये डॉ. रविंद्र भोयर यांच्या घरी रॅलीचा समारोप झाला. जन आशीर्वाद यात्रेत प्रामुख्याने आमदार अभिजीत वंजारी, गिरीश पांडव, शेखर सावरबांधे, विशाल मुत्तेमवार, अशोक धवड, राजा तिडके, उमेश डांगे, सुजाता कोंबाडे, गुड्डू तिवारी, छोटू भोयर यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर सायंकाळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री डॉ. सतीश चतुर्वेदी, आमदार अॅड. अभिजित वंजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जाटतरोडी, चंद्रमणीनगर आणि कुंभार टोली येथे तीन जनसभेचे आयोजन करण्यात आले होते.

SRT NEWS LIVE