निवड झाल्याबदद्ल मा.खा रामदास तडस यांचा शिक्षक कर्मचार्यांतर्फे सत्कार

खा.रामदास तडस यांचा सत्कार करताना आ.टेकचद सावरकर, राजेंद्र झाडे, बळवंत मोरघडे , देवेंद्र काळबांडे
Nag,26Sept:जिल्ह्यात अग्रण्य असलेेल्या जीवनविकास एज्युकेशन सोसायटी, सिरसपेठ, नागपूर चे अध्यक्षपदी वर्धेचे खासदार श्री.रामदास चंद्रभानजी तडस ह्यांची निवड झाल्यामुळे संस्थेच्या अतर्गत चालणाऱ्या सर्व शाळांमधील प्राचार्य, मुध्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यातर्फे नवप्रतिभा हायस्कुल, उमरेड रोड, .नागपूर येथील ‘‘कुसुमताई झाडे सभागृहात’’ भव्य सत्कार सोहळा झाला,यावेळी कामठी विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर ह्यांचे हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यांत आल. ही संस्था काॅग्रेसचे जेष्ठ नेते श्री.बाबुरावजी झाडे यांनी 1960 ला स्थापन केली असून ते संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष आहेत. या संस्थेच्या नागपूर जिल्ह्यात 1 वरिष्ठ महाविद्यालय, 2 कनिष्ठ महाविद्यालय,7 हायस्कूल,1 नाईट हायस्कूल, 1 इंग्रजी माध्यमाचे काॅन्व्हेंन्ट व हायस्कूल व ज्युनियर काॅलेज,1 अध्यापक विद्यालय आणी 1 कम्प्युटर इन्स्टीटयुट चालविल्या जातात. या संस्थेत जवळपास सर्व मिळून 200 पर्यंत कर्मचारी कार्यरत आहेत. याप्रसंगी मा.खा. रामदासजी तडस म्हणाले ही संस्था प्रामुख्याने शेतकरी, शेतमजुर, गरीब व कामगारांचे मुलांना शिक्षण मिळावे व रोजगार मिळावे यासाठी कार्य करीत असून या संस्थेच्या माध्यमातून गरजू विद्याथ्र्यांना योग्य व कमी खर्चात चांगले शिक्षण देण्याचा व संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. यासंस्थेनी ग्रामीण गरीब, गरजू शेतकर्यांच्या मुलांनाच संस्थेत नोकरीत घेवून त्यांचे जीवनमान उंचावलेले आहे. याप्रसंगी मंचावर संस्थेचे सचिव राजेन्द्र झाडे, कोषाध्यक्ष बळवंत मोरघडे, सहसचिव प्रवीण झाडे, उपाध्यक्ष वसंतराव झाडे, संचालक नितीन झाडे,प्रफुल्ल झाडे, माधुरी झाडे, दुष्यंत झाडे, प्राचार्य देवेन्द्र काळबांडे प्राचार्य देवमन कामडी तसेच मोठया संख्येनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थिती होते. प्रास्ताविक सचिव राजेंन्द्र झाडे तर संचालन व आभार कोषाध्यक्ष बळवंत मोरघडे यांनी मानले.
SRT NEWS LIVE