Home / CITY NEWS / देवेंद्र फडणवीसांच्या 2016च्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग

देवेंद्र फडणवीसांच्या 2016च्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला वेग

SRTV NEWS Live

शेतकर्‍यांना दिवसा वीज!
महाराष्ट्राच्या अक्षय्य ऊर्जेची पायाभरणी!
पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर सौरऊर्जेवर
40,000 कोटींची गुंतवणूक, 25 हजार रोजगार : चंद्रशेखर बावणकुळे

Mumbai,7March : महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. राज्यातील असंख्य शेतकर्‍यांची दिवसा वीजेची सातत्याने मागणी होती. ती आता पूर्ण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्राच्या कृषि जगतात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
सुमारे 9000 मे. वॉट सौरऊर्जेसाठी विकासकांना देकारपत्र (लेटर ऑफ अवॉर्ड) आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यातून 40,000 कोटी रुपये गुंतवणूक होणार असून, 25 हजार रोजगार निर्माण होणार आहेत. यामुळे पुढच्यावर्षी 40 टक्के कृषीफिडर हे सौरऊर्जेवर येणार असून, शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळणे शक्य होणार आहे.
उपमुख्यमंत्री व महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस मोलाचा ठरला… इथून पुढे महाराष्ट्र आणि माझा बळीराजा अधिक सुखी होईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!