Home / BREAKING NEWS / भाजपाचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्नरत : संदीप जोशी

भाजपाचा गड कायम राखण्यासाठी प्रयत्नरत : संदीप जोशी

SRTV NEWS Live

शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा गड पुढेही कायम राखण्यासाठी प्रयत्नरत आहे


Nag,9Nov:पदवीधर मतदार संघाचा नागपूर विभाग हा भारतीय जनता पार्टीचा गड आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक दिग्गजांनी तो कायम राखत आणला आहे. ही जबाबदारी आता पक्षाने आपल्या खांद्यावर दिल्याने पदवीधर, शिक्षकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा गड पुढेही कायम राखण्यासाठी प्रयत्नरत आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे नागपूर पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संदीप जोशी यांनी दिली.
ते म्हणाले, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नागपूर शहराचा महापौर असा दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनात प्रवास करीत आलोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच दिग्गजांनी आज या प्रवासात पदवीधरांचे नेतृत्व करण्याची, त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संधी म्हणून पक्षाने उमेदवारी दिली आहे.



Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!