वैद्यकीय संस्थेत त्यांचे योगदान हे विदर्भासाठी नक्कीच उपयोगाचे राहील

SRTVNEWSlive#Delhi/Nag:राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांची नागपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादी प्रमाणे नऊ AIIMS वर खासदारांच्या नेमणुका झालेल्या आहेत. डॉ. महात्मे स्वतः पद्मश्री पुरस्कृत नेत्रतज्ञ असल्यामुळे AIIMS सारख्या वैद्यकीय संस्थेत त्यांचे योगदान हे विदर्भासाठी नक्कीच उपयोगाचे राहील. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील समस्यांबाबत अनेक मुद्दे डॉ. महात्मे राज्यसभेत उचलतात. नुकतेच डॉक्टरांवर होणारे हल्ले, गटार साफ करणारे सफाई कामगार, लोकसंख्येचा विस्फोट आणि विषमता, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, अप्रशिक्षित डॉक्टरांकडून पोस्ट मोर्टम , युवकांमध्ये वाढते आत्महत्या व निराशेचे प्रमाण , घुमंतू चे प्रश्न इत्यादी विषयांवर राज्यसभेत चर्चा घडवून आणली. 1986 पासून गरजू रुग्णांसाठी सतत नेत्रसेवेचे व्रत घेतलेले आणि लाखो रुग्णांवर मोफत ओपरेशन करणारे डॉ. महात्मे AIIMS मध्येही आपल्या कार्याचा ठसा उमटवतील यात शंका नाही.
SRT NEWS LIVE