शनिवार, रविवार दोन दिवस स्वयंस्फूर्तीने घरातच राहा

Nag,4Dec : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या चिंतेची बाब आहे. आज प्रत्येकाने जबाबदारीची वागणूक ठेवून स्वतःची सुरक्षा घ्यायची आहे. कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. शनिवार (ता.५) आणि रविवार (ता.६) दोन दिवस नागपूर शहरात ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्याची मागणी जनप्रतिनिधींकडून करण्यात आली होती. सोशल मीडियावरही ‘जनता कर्फ्यू’ लागू होत असल्याचे संदेश व्हायरल होत आहेत. नागपूर महानगरपालिकेद्वारे ‘जनता कर्फ्यू’ संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतिही भीती न बाळगता बाजारांमध्ये गर्दी करू नये. शहराचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सर्वांनी या शनिवारी (ता.५) व रविवारी (ता.६) स्वयंस्फूर्तीने घरातच राहावे. कोरोनाला हरविण्यासाठी आपणा सर्वांनी घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
SRT NEWS LIVE