केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित विविध क्रीडा स्पर्धांना भेट दिली

Nag,6June : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांनी आज खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आयोजित विविध क्रीडा स्पर्धांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतः बास्केटबॉल, बॅडमिंटन आदी खेळांमध्ये सहभाग घेत खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.
<span;>त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धास्थळी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. खेळाडूंसह उपस्थित नागरिकांनीही त्यांच्या सहभागाचे स्वागत केले. या प्रसंगी त्यांनी क्रीडेला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी खेळांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

SRT NEWS LIVE