....दक्षिण नागपूर येथील सरस्वती बहुउद्देशीय सेवा संस्थाचा उपक्रम

Nag,26 Sept:नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रासगरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या रास गरबा महोत्सवात 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान सरस्वतीनगर येथील मंदीराच्या प्रांगणात प्रथम फेरी 28 तारखेला, द्वितीय फेरी 29 तारखेला, आणि 30 तारखेला तिसरी फेरी होईल. नंतरच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. सायंकाळी ७:३० वाजता गरबा स्पर्धा होणार आहे. महोत्सवा दरम्यान विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी, रात्री 10 वाजता.

पातोषिक वितरण केले जाईल. संस्थेचे सचिव संदीप शेन्डे यांनी हि माहिती दिली आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथीगण दक्षिण नागपूरचे आमदार मोहनभाऊ मते, माजी आमदार सुधाकरराव कोहळे माजी नगरसेविका माधुरीताई ठाकरे आणि उमारशंकर पर्वते सनदी अधिकारी यांची उपस्थिती प्रामुख्याने राहतील.
<span;>यावेळेस अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे व वस्तीतील नागरिकांनी सुद्धा उपस्थितीत राहण्याचे आवाहन केले आहे की, या रास गरब्याचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घेण्यात यावा असे म्हटले आहे. सरस्वती बहुउद्देशीय सेवा संस्थेचे युवक मंडळा च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात मनोज गौर, स्वनील बिंगेवार, आशिष अग्रवाल, जितेंद्र पांडे, शैलेश काहिलकर, प्रफुल घाडगे, रमेश बोबडे, सतीश चौधरी, सुनिकेत विंगेवार, शुभम बिंगेवार, रजत गज्जलवार, रितीन खिराळे, तुषार भागवत, अनिकेत खाडे, अंकित खाडे, रजत ढोले, शुभम जाधव, पंकज भिसेकर , स्वप्नील भिसेकर, शिवम अंबाळकर, रितीक अंबाळकर, अभिजीत गावंडे, चेतन किनगावकर, हरीश बैतुले, सागर किनगांवकर, हर्ष बेले, धवल भक्ता, रोहित गजबे, सुरज कुथे आधी युवक परिश्रम घेत आहे. आणि सल्लागार समितीचे देवराव प्रधान यांनी वरील माहिती प्रसिद्धी पत्रकार च्या माध्यमातून देत आहे.
SRT NEWS LIVE