Home / CITY NEWS / बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदीजींची सदिच्छा भेट

बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदीजींची सदिच्छा भेट

SRTV NEWS Live

पक्षकार्यासह जनकल्याणावर केले मार्गदर्शन

 

नवी दिल्ली,3 Sept : पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजी यांची दिल्ली येथील निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी सहकुटुंब भेट घेतली. प्रदेशाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांची पंतप्रधान मोदीजी यांच्याशी पहिलीच भेट होती.
नौदलाच्या ध्वजामध्ये परिवर्तन करून महाराष्ट्राचा गौरव वाढविल्याबद्दल श्री. बावनकुळे यांनी यावेळी पंतप्रधानाचे आभार मानले. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे प्रतिक असलेल्या शिवमुद्रेचे रूप नौदलाच्या प्रतीक चिन्हाला प्रदान करण्यात आले आहे याचा आवर्जून उल्लेख श्री बावनकुळे यांनी या भेटीत केला.  बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील पक्ष बळकटीसाठी करीत असलेल्या कामांची माहिती दिली. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार दमदारपणे जनकल्याणाचे काम करीत असून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय यंत्रणासह राज्यातील सर्व भाजपा कार्यकर्ते देखील हातभार लावत असल्याचा माहिती  श्री बावनकुळे यांनी दिली.
पंतप्रधान मा.श्री नरेंद्र मोदीजी यांनी पक्षकार्यासाठी मार्गदर्शन केले. शेतकरी, गरीब व दुर्बल घटकातील नागरिक व कुटुंबाच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे प्रयत्न करावेत अशी सूचना केली. 

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!