Home / BUSINESS / महा मेट्रोच्या प्रस्तावाला एनएचएआयची बिनशर्त मंजुरी

महा मेट्रोच्या प्रस्तावाला एनएचएआयची बिनशर्त मंजुरी

SRTV NEWS Live

कामठी मार्गावरील फ्लाय-ओव्हरच्या कामाला मिळणार गती

Nag,5Nov: शहराच्या अत्याधुनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाचा ठरणारा कामठी मार्गावरील फ्लाय-ओव्हरच्या निर्माण कार्यासाठी महा मेट्रोने सादर केलेल्या प्रस्तावाला एनएचएआयतर्फे मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता रिच-१ मार्गावर निर्माणाधीन फ्लाय-ओव्हरचे कार्य वेगाने पूर्ण होणार आहे. कार्य पूर्ण होताच देशातील पहिली ४ स्थरीय वाहतूक व्यवस्था नागपुरात पाहायला मिळणार आहे.
फ्लाय-ओव्हर तयार करण्यासाठी महा मेट्रोने सादर केलेल्या ५७३ कोटीं रुपयांच्या प्रस्तावाला एनएचएआयने बिनशर्त मंजुरी दिली आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोटिव्ह चौक मेट्रो स्टेशन दरम्यान मार्गावरील या फ्लाय-ओव्हरची लांबी सुमारे ५.३ किमी आहे. तसेच रिच-१ व्हायाडक्ट मेट्रो मार्ग एकूण लांबी ७.२३ कि.मी. पर्यंतचा आहे.
वाराणसी आणि हैदराबाद या दोन प्रमुख शहरांना जोडणाऱ्या या मार्गावरून दररोज असंख्य वाहने जात असतात. मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थाने, व्यावसायिक ठिकाणे, सिनेमा हॉल, मॉल्स या भागात आहेत. त्यामुळे भविष्यात कामठी मार्गवर निर्माणाधीन फ्लाय-ओव्हर आणि मेट्रो नागरिकांना बहुपयोगी ठरेल. तसेच रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी कारण्यास ही संरचना अत्यंत उपयुक्त ठरेल.
प्रस्तावाची काही ठळक वैशिष्ट्ये
१) प्रस्तावित फ्लाय-ओव्हर आणि मेट्रो ट्रॅक ‘राईट ऑफ वे’ – मेट्रोच्या पिलरवर उभारण्यात येणाऱ्या दोन दोन्ही स्ट्रक्चरमुळे खर्चात मोठी बचत होणार आहे.
२) एलआयसी चौकापासून सुरु होणारा हा फ्लाय-ओव्हर पुढे ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत राहील. फ्लाय-ओव्हरची एकूण किंमत ५७३ कोटी रु. आहे.
३) चार स्थरीय वाहतूक व्यवस्थेत या मार्गांचा समावेश – कामठी मार्ग, नागपूर-दिल्ली रेल्वे लाईन, फ्लाय-ओव्हर आणि मेट्रो मार्गे-व्हायाडक्ट.
४) गड्डी गोदाम परिसरातील गुरुद्वारा’जवळ या फ्लाय-ओव्हर आणि मेट्रो व्हायाडक्टची सर्वाधिक उंची अनुक्रमे १४.९ मीटर २४.८ मीटर आहे. याठिकाणी रेल्वे लाईन कामठी महा मार्ग ओलांडते.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!