Home / CITY NEWS / अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत सर्व्हेक्षण

अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत सर्व्हेक्षण

SRTV NEWS Live

करण्यात येवुन पिकांच्या नुकसान भरपाई पोटी प्रति हेक्टरी ५० हजार रुपये तर घरांच्या पडझडी करीता व घरातील सामानाच्या नुकसानी पोटी २५ हजार प्रति कुटुंब मदत दयावी जिल्हा भाजपाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Nag,3Aug: दिनांक २७ ,२८ ऑगष्ट २०२० दरम्यान नागपुर जिल्हयात अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीचे त्वरीत सर्व्हेक्षण करण्यात येवुन पिकांच्या नुकसान भरपाई पोटी प्रति हेक्टरी ५० हजार रुपये तर घरांच्या पडझडी करीता व घरातील सामानाच्या नुकसानी पोटी प्रति कुटुंब २५ हजाराची मदत दयावी यासाठी प्रदेश भाजपा महामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.यावेळी जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये,डॉ.राजीव पोतदार,संघटन महामंत्री किशोर रेवतकर,आमदार टेकचंद सावरकर,माजी आमदार सुधीर पारवे,मल्लीकार्जुंन रेडडी,चरणसिंग ठाकुर,जिल्हा महामंत्री इमेश्वर यावलकर,अजय बोढारे,अनिल निधान संध्याताई गोतमारे , रामराव मोहाडे, कपिल आदमने व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.नयांचे सह जिल्हयातील नेते उपस्थित होते.
सर्वत्र महापुर सदृष्य स्थिती निर्माण झाली. जिल्हयातील कन्हान,पेंच,कोलार,जाम,वर्धा या सर्व नदयांना महापुर आला होता.पुलावरुन पाणी वाहत असल्यामुळे अनेक गावांना पुराचा वेढा पडुन त्यांचा इतर गावांशी संपर्क खंडीत झाला होता.त्यातच अनेक धरणे तुडुंब भरल्यामुळे धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळेही महापुराची स्थिती आणखी बिकट झाली.
मोझॅक रोगामुळे सोयाबिन हातची गेल्यानंतर कापुस,धान साथ देतील अशी अपेक्षा असतांना सतत पडणा-या पावसामुळे आणि नदयांना आलेल्या महापुरामुळे शेतातील उभी पिके उध्वस्थ झाली आहेत. शेतात सर्वत्र पाणीच-पाणी असल्यामुळे कापुस,धान पिकेही संकटात सापडली असुन पिके सडण्याच्या मार्गावर आहेत.जिल्हयात सर्व नदयांच्या काठावरील अंदाजे एक ते दिड कि.मी. परीसरातील पिके वाहुन गेली आहेत. अशा वाहुन गेलेल्या शेती पिकाचे नुकसानीचे सर्व्हेक्षण त्वरीत करण्यात येवुन वाहुन गलेल्या व अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सर्व पिकांच्या नुकसानी पोटी सरसकट प्रति हेक्टरी रु ५० हजाराची आर्थीक मदत देण्यात यावी.अशी जिल्हा भाजपाची मागणी आहे.
तसेच सतत पडणा-या पावसामुळे व महापुरामुळे जिल्हयात अनेक घरांचीही पडझड झालेली आहे.इतकेच नाही तर अनेक घरांमध्ये पुराचे पाणी शिरुन घरातील सामानांचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या महापुरामुळे अनेक कुटुंब विस्थापीत झालेली असुन त्यांचे खाण्या-पिण्याचे साहीत्य एकतर भिजुन गेले किंवा पुरात वाहुन गेले.
अशा विस्थापीत कुटुंबांचे त्वरीत सर्व्हेक्षण करुन त्यांना तातडीने प्रति कुटुंब रु २५ हजार मदत देण्यात यावी अशीही जिल्हा भाजपाची मागणी आहे.
महापुरामुळे अनेकांची घरेही पडली आहेत.तर काहींची घरे वाहुन गेली आहेत. अशाही घरांचे त्वरीत सर्व्हेक्षण करुन त्यांच्या पुर्नवसनाची सोय करण्यात यावी घरांच्या पडझडीचे सर्व्हेक्षेण करण्यात येवुन त्यांना खावटी व नुकसान भरपाई पोटी रु २५ हजार प्रति कुटुब प्रमाणे देण्यात यावे. अशी जिल्हा भाजपाची मागणी आहे.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!