Home / BUSINESS / सेवासदनतर्फे मॅनेजमेंटया तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम: कांचनताई गडकरी

सेवासदनतर्फे मॅनेजमेंटया तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रम: कांचनताई गडकरी

SRTV NEWS Live

सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने बीए एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटया तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे आभासी स्वरूपात उदघाटन

Nag,13 Sept: सेवासदन शिक्षण संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या य. च. म. मु. विद्यापीठ संलग्नित बीए एव्हिएशन, हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंटया तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाचे आभासी स्वरूपात उदघाटन य.च.म.मु. विद्यापीठ नाशिकच्या नागपूर विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ.नारायण मेहेरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई गडकरी उपस्थित होत्या. उदघाटन प्रसंगी डॉ. नारायण मेहेरे यांनी नावीन्य पूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्याचा धाडसी निर्णय घेतल्या बद्दल सेवासदन शिक्षण संस्थेचे अभिनंदन केले. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती एअर इंडिया पश्चिम क्षेत्राचे महा व्यवस्थापक (वाणिज्य) बी.पी. कुलकर्णी , एम.ए.बी. एव्हिएशन प्रा.ली. चे प्रबंध संचालक मंदार भारदे व सेंटर पॉईंट नागपूर चे श्री अर्जुन अरोरा व केसरी टूर्सचे महाव्यवस्थापक शैलेश पाटील केसरी यांची होती. उपचारित पाहुण्यांनी आपले मत मांडून विध्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
अध्यक्षीय भाषण सौ. कांचनताई गडकरी यांनी नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण रोजगाराची संख्या विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याच्या आनंद होत असल्याच्या मत प्रकार केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. कल्पना तिवारी उपाध्याय यांनी केले तर उदघाटन समारंभाचे आभार संस्थेचे सदस्य अरविंद कॉमवर यांनी केले. कार्यक्रमत संस्थेचे उपाध्यक्ष बापू साहेब भागवत , श्री समयजी बनसोड , केंद्रप्रमुख सौ. डॉ. मंजिरी पाठक, केंद्र संयोजक प्रो. सतीश पांडे व इतर शिक्षकवृंद व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

फेडरेशन ऑफ एसोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र {FAM} ने “व्यापारी एकता दिवस” के रूप में मनाया

SRTV NEWS Live48वां स्थापना दिवस — “ज्ञान मंथन” एवं FAM गौरव पुरस्कार समारोह का भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!